फलटण दि.१६ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या चौवार्षिक निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची आगामी ४ वर्षासाठी “अध्यक्ष”पदी, मा.ना.डॉ.जितेंद्र सतीश आव्हाड (ठाणे) यांची “उपाध्यक्ष”पदी बिनविरोध फेर निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या चौवार्षिक निवडणूकीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश मा.श्री.दिलीप कृष्णा गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यानुसार १६ जागांपैकी १३ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या सर्व पदांची निवड “बिनविरोध” झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषीत केले, तर स्विकृत उपाध्यक्षपदाच्या ३ जागा रिक्त राहिल्या.
“अध्यक्ष”पदी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), (सातारा), “उपाध्यक्ष”पदी (एकूण पदसंख्या ४) मा.ना.डॉ.जितेंद्र सतीश आव्हाड (ठाणे), मा.श्री.महेश चंद्रकांत गादेकर (सोलापूर), मा.श्री.अशोक धनराज पितळे (अहमदनगर), मा.श्री.विजयराव महादेव मोरे (रायगड), “कार्याध्यक्ष”पदी मा.श्री.सचिन नरसिंह गोडबोले (पुणे), “सरचिटणीस”पदी मा.श्री.गोविंद सत्यनारायण शर्मा (औरंगाबाद), “संयुक्त चिटणीस”पदी (एकूण पदसंख्या ५) मा.श्री.राजेश रतनराव सोनवणे (नंदुरबार), मा.डॉ.पवन प्रकाशराव पाटील (परभणी), मा.श्री.जयांशु गणपत पोळ (जळगाव), मा.डॉ.प्रशांत संपत इनामदार (सांगली), मा.सौ.गंधाली महेश पालांडे (ठाणे), “खजिनदार”पदी मा.डॉ.अरुण गोविंद देशमुख (मुंबई) या प्रमाणे सर्व पदाधिकारी निवडी बिनविरोध झाल्या आहेत.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या चौवार्षिक निवडणूका बिनविरोध पार पडल्यानंतर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब, असोसिएशनचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्यासह अनेकांनी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र मा.ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सन २०१६ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने मा.श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांचेवर सोपविली होती, त्यानंतर मा.श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी खो-खो खेळाच्या वाढीसाठी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर नुकतीच किशोर/किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा, फलटण येथे अत्यंत दिमाखदारपणे आणि सर्वप्रकारच्या सुविधा खेळाडू व संबंधीत अधिकारी यांना उपलब्ध करुन देवून दर्जेदार पध्दतीने पार पाडल्या. त्यावेळी सर्वांनीच मा.श्रीमंत संजीवराजे (बाबा) व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करताना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी, स्पर्धा यशस्वीरित्या कशा पूर्ण कराव्या याचे एक उत्तम उदाहरणच या निमित्ताने सर्वच राज्यांना उपलब्ध झाल्याचे सांगत अनेकांनी या राष्ट्रीय स्पर्धा नियोजनाचे तोंडभरुन कौतुक केले.
त्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि.१२ रोजी पुणे येथे झालेल्या खो-खो असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मा.श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांची “अध्यक्ष”पदी बिनविरोध फेर निवड करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री मा.मंत्री मा.श्री.शामराव अष्टेकर, मा.श्री.बाळासाहेब भिलारे, सचिव मा.श्री.महेंद्र गाढवे व संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. राजे ग्रुप, फलटण.