फलटण येथे कोरोना बाबत आढावा बैठक संपन्न

आसु (आनंद पवार) : संपूर्ण देशास जगात थैमान घालणाऱ्या कोरोना बाबत सर्वांनी दक्षता पाळणे गरजेचे बनले आहे पूर्वी आपल्या देशातील संस्कृतीचे पालन केले होते परंतु आता कोरोना घालण्यासाठी या संस्कृतीचे पालन करणे महत्त्वपूर्ण ठरेल कारण पूर्वी घरात येण्या अगोदर आपण स्वच्छता बाळगायचो त्या पद्धतीची स्वच्छता बाळगणे आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी केले
       फलटण येथे पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना बाबत आयोजित केलेल्या बैठकीत श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर बोलत होते यावेळी उपसभापती रेखाताई खरात, माजी सभापती रेश्मा ताई भोसले, प्रतिभा धुमाळ, संजय कापसे सचिन रणवरे, संजय सोडमिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोटे, गटविकास अधिकारी डॉक्टर अमित गावडे जिल्हा हिवताप अधिकारी सौ. जंगम डॉक्टर मदने तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.      
     कोरोना बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे कोरोना बाबत दक्षता बाळगणे महत्त्वाचे आहे भीती बाळगण्यापेक्षा याबाबत दक्ष राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले साबना पेक्षा लिक्विड सोप चा वापर करावा कारण साबण हे अनेक व्यक्ती वापर करतात परंतु लिक्विड सोप चा वापर एकच व्यक्ती करू शकते त्यामुळे लिक्विड सोप वापरणे योग्य आहे इतर आफवा वरती विश्वास ठेवण्यापेक्षा सर्वांनी स्वच्छता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा हिवताप अधिकारी सौ.जंगम यांनी केले कोरोना बाबत संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत थेट आमच्याशी संपर्क करावा सोशल मीडियावर वायरल करण्यापेक्षा याबाबत माहिती आम्हाला द्यावी अशी विनंती डॉक्टर अमित गावडे व डॉ. पोटे यांनी केले यावेळी ग्रामसेवकांनी कोरोना विजयी प्रशासनासमोर मांडल्या प्रशासनाने पण या समस्या वरती सकारात्मक असे उत्तर दिले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!