बारामती : “आरोग्याची योग्य दक्षता व प्रसार होऊ नये या साठी हस्तांदोलन नको त्याच प्रमाणे प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धोनें गरजेचे आहे आदी सर्व महत्वपूर्ण बाबी मुळे कोरुणावर सर्व मानवजात एकत्रित मात करू शकतो “असे मत प्रसिद्ध छातीरोग तज्ञ डॉ अजिंक्यराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.कोरोना विषयी घ्यावयाची काळजी या विषयी वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ निबाळकर बोलत होते.या प्रसंगी डॉ अशोक तांबे,डॉ मनोज शिंदे, वीर सावरकर चे संचालक विश्वास शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब माने,आदेश शेळके,आत्माराम हिंगणे,कॉसमॉस बँकेचे निकम साहेब, आदी मान्यवर उपस्तीत होते. कोरोना वर जो पर्यंत लस उपलब्ध होत नाही तो पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे परंतु दक्षता आपल्या हातात आहे ,हस्तांदोलन नको,गर्दी मध्ये फिरू नका,घसा खवखव करणे,सर्दी वारंवार होणे आदी बाबी होत असल्यास त्वरित खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखवा असेही डॉ अजिंक्यराजे निबाळकर यांनी सांगितले.