एमआयडीसी मध्ये 'कोरोना'ची धास्ती सुभद्रा मॉल,विद्या कॉर्नर व इतर ठिकाणी तुरळक गर्दी

बारामती:वार्ताहर बारामती एमआयडीसी मध्ये ‘कोरोना’ चे संकटा मुळे उत्पादनासह  निर्यात सुद्धा घटली आहे  देशातील व परदेशातील होणाऱ्या ऑर्डर वर विपरीत परिणाम झाला आहे.
मंदीच्या सावटाखाली असलेल्या उद्योगांना आता कोरोना  वायरसचा फटका बसला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणामुळे जागतिक स्तरावर मंदीचे वारे वाहत होते परंतु बारामती मध्ये आता मोठ्या उद्योग समुहा बरोबर छोट्या उद्योजकांना सुद्धा कोरोणा वायसरचा प्रतकेश  अप्रत्यक्ष तोटा होत आहे अनेक उत्पादक संकटामध्ये असल्याची चर्चा आहे. साठ टक्क्यावर उत्पादन आले असून उत्पादनक्षमता घडली आहे मागणी मंदावल्यामुळे उत्पादनांमध्ये घट झाली आहे मोठ्या कंपन्या वर झालेल्या परिणामामुळे लघुउद्योजक सुद्धा अडचणीमध्ये ते आले आहेत त्यांच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत .दरम्यान वीज दरवाढीमुळे धास्तावलेले अनेक उद्योजक आता ‘कोरोना’  संकटामुळे अडचणीमध्ये आले आहेत बारामती एमआयडीसी मध्ये परिस्थिती अडचणीची आहे मंदी बरोबर उत्पादनावर परिणाम होत असताना अनेक उद्योजकांना आता राज्यातील व  परप्रांतातली मजूर कामाला सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे एकीकडे उत्पादनाला भाव नाही दुसरीकडे उत्पादन तयार करताना अनंत अडचणी तिसरीकडे वीज दरवाढ त्याचप्रमाणे एमआयडीसी विभागाचे विविध प्रकारचे वाढलेले टॅक्सेस आणि आता कोरोणा वायरसचा झालेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या मुळे उद्योजक चिंतेत आहेत. एमआयडीसी मधील पेन्सील चौक व येथे नेहमी गजबजनारा सुभद्रा मॉल ,विद्या कॉर्नर,पेन्सिल स्केवर,संदीपा कॉर्नर येथे मात्र गर्दी कमी होती.आवश्यक असणाऱ्या जीवनाशयक वस्तू खरेदी करताना नागरिक दिसत होते.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!