शिवनंदन हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

 बारामती :वार्ताहर बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटल  यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील 90 जणांनी  रक्तदान केले वुई द फ्युचर ग्रुप बारामती च्या   सभासदांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरा मध्ये सहभाग घेतला   यावेळी रक्तदान करणाऱ्याना  प्रशस्तीपत्र देऊन व पेन ड्राइव्ह देऊन सन्मानित करण्यात आले “रक्तदान ही काळाची गरज आहे व बारामती ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ” सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शिवनंदन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश बोके व डॉक्टर तुषार गदादे यांनी सांगितले.या  या वेळी वुई द फयुचर ग्रुप चे लक्ष्मण जगताप,राजेंद्र वणवे,शब्बीर कायमखानी,संदीप गादीया,मंगेश दोशी, प्रशांत गादीया,ऋषिकेश किर्वे, चारुदत्त पेंढारकर, बाळू माने आदी मान्यवर उपस्तीत होते. 
फोटो ओळ रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करताना डॉ. गणेश बोके व इतर मान्यवर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!