फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व फलटण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 मार्च 2020 रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात्रा शिबिरासाठी 61 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य भूषविले आहे . सदर रक्तदान शिबिरासाठी फलटण ब्लड बँकेचे डॉ. बिपिन शहा डॉ. डी.टी. देशपांडे , सारिका बुधावले ,संजय इंगवले , हनुमंत वाघमारे, हिना मनेर, आप्पा नाळे ,रमेश शिंदे, स्नेहल चव्हाण यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबिर प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद दावणे, प्रा. गणेश शिंदे यांनी सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांच्या सहकार्याने संपन्न केले आहे तसेच शारीरिक शिक्षण प्रशिक्षक प्राध्यापक प्रशांत सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.