बारामती: वृत्तसेवा शिवजयंती निमित्त मिरवणुकीची खरी ओळख निर्माण करणारे पारंपरिक कलाकार गोंधळी,पोतराज, वाघ्या मुरळी व चित्तथरारक कसरती लाठीकाठी,तलवार बाजी,ढालपट्टा,आदी सादर करणाऱ्या खेळाडू चा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबीर व विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांचे शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील व्यख्यान आदी कार्यक्रम घेऊन सिनेमा रोड येथील न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान च्या वतीने नाविन्यपूर्ण शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत सातव, मिरवणूक उत्सव कमिटी अध्यक्ष सुनिल शिंदे,न्यू शिवक्रांती युवा
प्रतिष्ठान चे संस्थापक हेमंत नवसारे व अध्यक्ष अर्जुन कदम आणि आदी मान्यवर ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते. मिरवणुकीत अवास्तव खर्च टाळून सामाजिक उपक्रम व कलाकारांचा सन्मान करून शिवरायांचे विचार तळागाळात पोचविण्याचे कार्य करत असल्याचे हेमंत नवसारे यांनी सांगितले. या प्रसंगी मिरवणूक मध्ये उत्कृष्ठ चित्ररथ बदल अखिल कसबा युवक मंडळ तर उत्कृष्ठ देखावा साठी शिवराज्य प्रतिष्ठान याना सन्मानित करण्यात आले.पर्यावरण,लेक वाचवा आदी क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आरोग्य शिबीर साठी उज्जवल आरोग्य प्रतिष्ठान व आरोग्य हॉस्पिटल यांनी सहकार्य केले व या मध्ये दोनशे जणांची तपासणी करण्यात आली.