फलटण : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते मजबुतीकरण व सुधारणा, छोटे पूल, पोहोच रस्ते, रिंग रोड भूसंपादन आणि शहरातील बाह्यवळण मार्ग यासाठी ७४ कोटी २० लाख रुपयांचा भरीव निधी राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून उपलब्ध झाल्याची माहिती मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली आहे.
राज्याच्या अर्थ संकल्पात सार्वजनिक बांधकाम विभाग लेखाशीर्ष ५०/५४ मध्ये ही भरीव आर्थिक तरतूद करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा.ना.दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण यांनी मोलाची मदत केल्याचे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
रस्ते मजबुतीकरण व सुधारणा कामासाठी विविध १५ रस्त्यांसाठी ५० कोटी २० लाख रुपये, लहान पूल व पोहोच रस्त्यांच्या ३ कामांसाठी ८ कोटी रुपये, लहान पुलांच्या २ कामांसाठी ३ कोटी ५० लाख रुपये, लहान पूल व रस्ता सुधारणा एक कामासाठी २ कोटी रुपये, रिंग रोड भूसंपादन कामासाठी ५ कोटी रुपये आणि फलटण शहरातून जाणार्या रिंग रोड (बाह्यवळण रस्त्यांसाठी) ५ कोटी ५० लाख रुपये अशी एकूण ७४ कोटी २० लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करुन घेण्यात आली असल्याचे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सांगितले.
५० कोटी २० लाख रुपयांच्या रस्ते मजबुतीकरण व सुधारणा कामामध्ये १) काळज सासवड हिंगणगाव सालपे रस्ता प्रजिमा ५ सुधारणा करणे भाग काळज ते सालपे १ कोटी रुपये, २) रावडी कुसुर तरडगाव भुरकरवाडी चव्हाणवाडी रस्ता प्रजिमा १०४ कि. मी. ०/०० ते २/०० आणि कि.मी.१०/०० ते १२/०० सुधारणा करणे, भाग रावडी ते कुसुर आणि भुरकरवाडी ते चव्हाणवाडी १ कोटी रुपये, ३) वाघोशी वडगाव मलवडी खडकी नांदल रस्ता प्रजिमा १०५ कि. मी. ६/०० ते ८/०० सुधारणा करणे, भाग मलवडी खडकी १ कोटी रुपये, ४) प्रजिमा १५ ते घाडगेमळा मुळीकवाडी सासवड पवारमळा रस्ता प्रजिमा ११० सुधारणा करणे भाग सासवड ते ओढा १ कोटी २० लाख रुपये, ५) गिरवी दुधेबावी ते वडले पिंप्रद राजाळे सांगवी रस्ता प्रजिमा ८७ भाग वडले ते राजाळे ची सुधारणा करणे २ कोटी रुपये, ६) सासकल भाडळी बु॥ सोनवडी बु॥ विडणी सांगवी रस्ता प्रजिमा ८८ भाग सासकल सोनवडी बु॥ ते विडणी ते सांगवी रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये, ७) फलटण आसू तावशी रस्ता कि.मी.२३/८०० ते २८/०० मध्ये रुंदीकरण व सुधारणा करणे प्रजिमा ७ भाग पवारवाडी ते आसू ३ कोटी रुपये, ८) बरड निंबळक टाकळवाडा राजाळे रस्ता प्रजिमा ९० कि.मी. ७/०० ते १५/०० सुधारणा करणे भाग बरड ते निंबळक ते राजाळे, ३ कोटी रुपये, ९) कापडगाव आरडगाव कापशी आळजापूर रस्ता प्रजिमा ४ कि.मी. ०/०० ते ३/००, ६/०० ते ९/००, ११/०० ते १५/०० ची सुधारणा करणे, ४ कोटी ५० लाख रुपये, १०) दुधेबावी तिरकवाडी सोनवडी बु॥ विडणी राजाळे रस्ता प्रजिमा १०८ भाग दुधेबावी ते तिरकवाडी ते विडणी राजाळे सुधारणा करणे ५ कोटी ५० लाख रुपये, ११) जिंती साखरवाडी बडेखान नांदल बिबी ताथवडा उपळवे दर्याचीवाडी बोडकेवाडी गिरवी रस्ता प्रजिमा ८ कि.मी. ७/०० ते १४/०० ची रुंदीकरणसह सुधारणा करणे भाग साखरवाडी ते बडेखान ते घाडगेमळा ७ कोटी रुपये १२) मेखळी गोखळी गुणवरे निंबळक पिंप्रद रस्ता प्रजिमा ११ कि.मी. ५/०० ते १५/०० ची रुंदीकरणासह सुधारणा करणे ७ कोटी रुपये, १३) फडतरवाडी सोमंथळी जुनी रेल्वे लाईन पर्यंत रस्ता प्रजिमा १०९ कि.मी. ०/०० ते १०/०० भाग फडतरवाडी ते चौधरवाडी सुधारणा करणे १० कोटी रुपये, १४) रावडी कुसुर तरडगाव भुरकरवाडी चव्हाणवाडी रस्ता प्रजिमा ४ कि.मी. ०/०० ते २/०० आणि १०/०० ते १२/०० ची सुधारणा करणे भाग रावडी ते कुसुर व भुरकरवाडी ते चव्हाणवाडी १ कोटी रुपये १५) वाघोशी वडगाव मलवडी खडकी नांदल रस्ता प्रजिमा १०५ कि.मी. ६/०० ते ८/०० सुधारणा करणे भाग मलवडी ते खडकी १ कोटी रुपये. असे १५ कामासाठी एकूण ५० कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सांगितले.
फलटण तालुक्यात लहान पूल व पोहोच रस्ते कामासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये १) जिंती फलटण निरगुडी गिरवी रस्ता प्रजिमा १० कि.मी.१२/६०० जाधववाडी जवळ लहान पूल व पोहोच रस्ता बांधकाम करणे, २ कोटी रुपये, २) प्रजिमा ८६ पिसाळवस्ती जवळ कि.मी. १४/४०० ते १४/६०० लहान पूल पोहोच रस्त्यासह बांधणे २ कोटी रुपये, ३) गिरवी मांडवखडक दालवडी वाखरी शेरेचीवाडी निंभोरे जिंती रस्ता मध्ये दालवडी येथे उंच पुलासह रस्त्याची सुधारणा करणे ४ कोटी रुपये, असे ४ कामासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सांगितले.
लहान पुलांच्या २ कामांसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये फलटण आसू तावशी रस्ता ते जिल्हा हद्द रस्त्यावर अलगुडेवाडी जवळ कि.मी.३/६०० मध्ये लहान पूल बांधणे १ कोटी ५० लाख रुपये, २) फलटण आसू तावशी रस्ता ते जिल्हा हद्द रस्त्यावर गोखळी पाटी जवळ कि.मी.१९/३०० मध्ये लहान पूल बांधणे २ कोटी रुपये.
लहान पूल व रस्ता सुधारणा करणे प्रजिमा १५ ते घाडगेमळा मुळीकवाडी सासवड भुरकरवाडी पवारमळा रस्ता प्रजिमा ११० भाग सासवड ते भुरकरवाडी मध्ये लहान पुलासह रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये.
आदर्की मिरगाव फलटण रस्ता राज्य मार्ग १४९ कि.मी. ३१/०० ते ३५/०० भाग फलटण शहरातील बाणगंगा पूल ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक बाह्यवळण रस्ता (रिंग रोड) रस्ता दुभाजक व चौपदरीकरणासह सुधारणा करणे ५ कोटी ५० लाख रुपये आणि फलटण बाह्यवळण रस्ता रामा १४९ भाग फलटण दहिवडी रस्ता रामा ६० ते फलटण पंढरपूर रस्ता प्रजिमा १५ पर्यंत झिरपवाडी सोनवडी विडणी कोळकी भूसंपादन करणे ५ कोटी रुपये.
याप्रमाणे फलटण शहर व तालुक्यातील रस्ते व पुलांच्या २३ कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ७४ कोटी २० लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याचे मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.