बारामती:सध्या संपूर्ण जगात थैमान घातलेल्या “कोरोना” व्हायरसबाबत कर्मचार्यांना माहिती व्हावी,त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यासाठी बारामती औद्योगिक क्षेत्रातील श्रायबर डायनामिक्स डेअरीजने पुढाकार घेऊन शुक्रवार दि.६ मार्च रोजी कंपनीच्या सर्व कर्मचार्यांसाठी माहिती प्रशिक्षण आयोजित केले. सदर कार्यक्रमा अंतर्गत कर्मचार्यांना कोरोना व्हायरस बाबत माहिती देण्यात आली. सर्वांना सदर रोगाबाबतचे माहिती पत्रक तसेच हँड सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर, टॉड नेल्सन, प्लांट हेड, जितेंद्र जाधव, व कंपनी चे अधिकारी मनोज भुतकर, रविन्द्रनाथ मिश्रा, पार्था त्रिपाठी, विनोद गुप्ता, आशिष चिंचमाळातपुरे, अनिल कुमार, हेमंत चव्हाण, शिवाजी धुमाळ, हनुमंत जगताप, अंकुश दरेकर, रावसाहेब मोकाशी, मुकेश चव्हाण, सुजय कांबळे, विनायक शेटे व आदी कर्मचारी उपस्थित होते. कोरोना व्हायरस चा संसर्ग दिवसेंदिवस पसरत असून संपूर्ण जगाला याचा धोका आहे. या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन आपण व आपल्या परिवारास सुरक्षित ठेवावे असे प्रतिपादन श्री. टॉड नेल्सन यांनी केले. कंपनी अशा प्रकाराच्या आपत्तीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच योग्य ती खबरदारी घेत असते. व अशा आपत्ती बाबत माहिती देणे, त्यांना योग्य ती साधणे पुरविणे याबाबत सदैव पुढाकार घेत असते. हा व्हायरस पसरू नये म्हणुन सर्वजण आपल्या व आपल्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेऊन या आपत्ती वर ही मात करतील असा विश्वास श्री. जितेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.