फलटण येथे पीयूसी सेंटर व सर्व वाहनांच्या इन्शुरन्स कार्यालयाचे उद्घाटन : श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते संपन्न

फलटण : जिंती नाका येथे ऑनलाइन गव्हर्नमेंट ऑथरायज पीयूसी सेंटर तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे इन्शुरन्स तसेच फासटॅग कार्यालयाचे उद्घाटन साई इंटरप्राईजेस कार्यालयाची फित कापून मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा.अध्यक्ष सातारा  जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी श्रीमंत संजीवराजे यांचे स्वागत सतीश पाटणे यांनी केले तसेच मा. जि. प. सदस्य विश्वासदादा गावडे यांचे स्वागत मसूद शेख यांनी केले तसेच महादेव माने संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना यांचे स्वागत प्रदीप लंबाते यांनी केले.                                       यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगाकडे वळावे आज या तीन युवकांनी या उद्योगाची सुरुवात केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद  आहे या तरुणांनी इतर व्यवसाय सांभाळून या व्यवसायात पदार्पण केले आहे सध्याच्या युगात पर्यावरण वाचवण्यासाठी वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांची वेळोवेळी पियूसी करणे गरजेच आहे.   तसेच आपण वाहन इन्शुरन्स काढणेही गरजेचे आहे . तसेच टोल नाक्यावरती  वेळेची बचत करण्यासाठी सरकारने फासटॅग सुविधा आणली आहे या तिन्ही गोष्टी या युवकांनी एकाच ठिकाणी फलटणकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. साई इंटरप्राईजेस हा उद्योग यशस्वीरीत्या नावारूपाला येईल. असे उद्गार श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले  व सतीश पाटणे, मसूद शेख, प्रदीप लंबाते  यांना शुभेच्छा दिल्या                       तसेच याप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोरसिंह उर्फ भैया   नाईक निंबाळकर, यशपाल भोसले, तुषार नाईक निंबाळकर, अमित गाडे, अमरसिंह देशमुख, तेजसिंह इंगळे , धनंजय पिसाळ ,महेश सुतार ,गणेश पवार , गणेश पाटणे, संतोष पाटणे, सुनील घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार संतोष पाटणे यांनी मानले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!