बारामती: बारामती तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक 23 / 02 / 2020 रोजी जिल्हा राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे वर्ल्ड अँथोरीटी शोतोकान असोसिएशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते ओपन राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये के.ए.सि.एफ.ईंग्लिश मिडीयम स्कूलच्या एकूण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता के.ए.सि.एफ.च्या विद्यार्थ्यांनी ओपन राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण कराटे खेळामध्ये एकूण 22 पदके आणि 2 वेस्ट ल्पेअर्स मिळवत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .यासोबतच ओपन कराटे स्पर्धेमध्ये के.ए.सि.एफ ईंग्लिश मिडीयम स्कूलला उपविजेता पदाने सन्मानित करण्यात आले .*
स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना बारामतीचे प्रसिध्द कराटे प्रशिक्षक मिनींनाथ भोकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विदयार्थ्यांना तसेच स्कूलला मिळालेल्या यशाबद्दल स्कूलचे उपाध्यक्ष मा. प्रशांत ( नाना ) सातव व स्कूलचे अध्यक्ष मा. हनमंत ( आप्पा ) मोहिते तसेच स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. संगिता व्यास मँडम , सर्व शिक्षक व्रुंद व सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले