अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मराठी दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी,सचिव सौ.संगीता मोकाशी व पालक उपस्थित होते.यावेळी सर्व विद्यार्थी हे पारंपारिक पोशाख परिधान करून आले होते.यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन पाहुण्याच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी काढली.तसेच पारंपारिक खेळ साजरे करत मराठी गाण्यांवरती ठेका धरला तसेच शिवराज्यभिशेक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.या वेळी मुलांनी विविध भाषणे सादर करत मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता भंडलकर व सुहास आटोळे यांनी विशेष कष्ट घेतले.