बारामती : संत निरंकारी मिशन बारामती क्षेत्रातील सेवादलाच्या वतीने क्षमा याचना दिवस रविवारी दी.१ मार्च रोजी संपन्न झाला.
या सेवकांकडून गेल्या वर्षभरात मिशनच्या माध्यमातून अनुयायांची सेवा करत असताना काही चुकले असल्यास किंवा एखाद्याचं मन दुखावलं असेल तर त्यांची माफी मागण्याचा दिवस म्हणजे क्षमा याचना दिवस होय. या निमित्ताने विशेष सत्संग सोहळा आयोजित केला होता.
या सत्संगच्या प्रमुख स्थानी सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे होते. यावेळी बारामती क्षेत्राचे संचालक किशोर माने, सेकटर संयोजक प्रमोद जगताप तसेच क्षेत्रातील सर्व शाखांचे मुखी यांच्यासह बारामती, इंदापूर, फलटण, दहिवडी, खंडाळा, वाई आदी भागांतील तीन हजार स्वयंसेवकां सह निरंकारी अनुयायी उपस्थित होते.
या सोहळ्याचे उत्कृष्ट मंचसंचालन सेवादलाच्या महिला अधिकारी पायल झांबरे, पुरुष अधिकारी प्रफुल्ल वाळवेकर यांनी केले.