वाखरी फलटण ता १- आध्यत्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे आसू येथील ह भ प श्री सदाशिव राजाराम झांबरे (दादा) यांना आज वाखरी येथील सद्गुरू महादेवनाथ महाराज शांती सेवा मंडळातर्फे दिला जाणारा मनाचा जीवनगौरव पुरस्कार प पू श्री सुंदरगीरी महाराज मठाधिपती पुसेगाव मठ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आदरणीय दादांचा सहस्त्र चंद्रदर्शन सन्मान सोहळा व धान्यतुला करण्यात आली.
कार्यक्रमास जेष्ठ नेते सुभाष शिंदे, सदगुरु उद्योग समूहाचे चेअरमन दिलीपसिंह भोसले, जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, जि प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, शरयु साखर कारखान्याचे संचालक अविनाश भापकर डॉ नंदकुमार झांबरे आदी मान्यवरांसह पुरस्कार प्राप्त मान्यवर अध्यात्मिक क्षेत्रातील गुणीजन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन ह भ प श्री केशव महाराज जाधव यांनी केले.