बारामती : रविवार दि.1 मार्च रोजी सांयकाळी सहा च्या सुमारास झालेल्या वादळी वारा व अवकाळी झालेल्या पावसाने बारामती भिगवण रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीत प्रवेशद्वार जवळ ‘बाभूळ’ जातीचे जुने व मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले त्यामुळे बारामती भिगवण रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला व वाहतूक ठप्प झाली.झाड पडल्याच्या वेळी त्याक्षणी जवळपास कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही