फलटण दि. २९ : कोल्हापूर पोलीस संग्रहालय डिझाइन करण्याच्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविणाऱ्या केन ग्रुपचे आर्किटेक्ट स्वीकार मेहता, आर्किटेक्ट किरण भोसले, आर्किटेक्ट अविनाश कवठालकर यांना कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विस्पायर असोसिएशन व व्हर्सटाईल ग्रुप, कोल्हापूर आयोजित कलाब्धी २०२० मध्ये सदर आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जानेवारी २०२० मध्ये जागतिक स्तरावर आयोजित स्पर्धेत केन ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावून या क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर आता कोल्हापूर येथील या स्पर्धेतील यशाबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.