बारामती: रुई, जळोची, सावळ ता. बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल्सचा राजभाषा दिन, आनंदी बाजार, आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे पोदार जम्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पवार, काझड येथील प्रगतशील शेतकरी अंकुशराव नरुटे, जळोची विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्रीरंगराव जमदाडे,ज्ञानसागर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे सर, उपाध्यक्ष रेश्मा गावडे, सचिव मानसिंगआबा आटोळे, संचालक दीपक सांगळे, पल्लवी सांगळे, अलकाताई आटोळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, नीलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर आदी मान्यवर उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांना वस्तू खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्ञान अवगत व्हावे, त्यांच्यामध्ये दूरदर्शन व चॅनेल च्या दुनियेंतरी, मराठी या आपल्या मातृभाषेविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये मराठी वाचन-संस्कृती वृद्धिंगत व्हावी व त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, संशोधनवृत्ती विकसित व्हावी व या बालशास्त्रज्ञांतून भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व भारतीय शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या हेतूने या कार्यक्रमाचे चे आयोजन केल्याचे ज्ञानसागर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे यांनी सांगितले. आभार प्रा जायपत्रे यांनी मानले.