बारामती: विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचे उदघाटन विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेतील मराठी विभाग प्रमुख मंजुषा सावंत व शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
सजविलेल्या पालखीत ठेवलेल्या ग्रंथांचे पूजन करून या ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली.छञपती शिवाजी महाराज ,छञपती संभाजी महाराज तसेच अनेक संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .यावेळी माय मराठी या गीतावर एका मुलीने नृत्य केले .मराठीचे महत्त्व सांगणारे भाषण सादर करण्यात आले.तसेच काव्यवाचन करण्यात आले. ग्रंथदिंडीने पेन्सिल चौकातील उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले .
ग्रंथदिंडीच्या सोबतीला असणाऱ्या शाळेतील लेझीम पथकाने मराठमोळ्या संस्कृतीचा परिचय करून दिला.डोक्यावर भगवे फेटे घातलेल्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्रातील ज्या महान व्यक्तींना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले.तसेच मराठी साहित्य समृद्ध करणारे लेखक व कवी या सर्वांचे फोटो या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले होते.त्यामुळे पारंपारिक पणे साजरा करण्यात आलेला मराठी राजभाषा दिन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
फोटो ओळ पेन्सिल चौक येथे कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी