आसु : जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती फलटण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा व शिक्षण महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद शिंदेवाडी (माऊली गार्डन खुंटे )येथे केले गेले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ रेखाताई खरात, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, शिंदेवाडी गावच्या सरपंच सौ बोरावके व श्री खरात तसेच खुंटे केंद्र समूहातील सरपंच ,उपसरपंच व आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व सरस्वती पूजन करून करण्यात आले तसेच मुलांनी ईशस्तवन सादर केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे यांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री रणवरे साहेब यांनी केले , प. स. उपसभापती रेखाताई खरात यांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री रणवरे यांनी केले , श्री राजेंद्र शिंदे यांचे स्वागत शिंदेवाडी सरपंच सौ. बोरावके यांनी केले.
यावेळी बोलताना फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे म्हणाले की जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा उत्तम आहे .असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच. मेळाव्यात अनेक फनी गेम व प्रश्नमंजुषा तसेच विविध कला सादर करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी गोसावी केंद्र शाळा कांबळेश्वर यांनी केले.