फलटण: मुधोजी महाविद्यालय फलटण मराठी विभाग आयोजीत,मराठी राजभाषा दिन व पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या वेळेस श्री गणेश तांबे यांच्या पाझर मातृत्वाचा…! या संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.यावर बोलताना श्रीमंत संजीवराजे यांनी पाझर मातृत्वाचा हे पुस्तक सर्वांनाच वाचनासाठी आवडेल व निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार काढले.या पुस्तकांमध्ये पहिलीपासून ते शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांचे सुंदर असे लेख संपादित करण्यात आले आहेत.या पुस्तकामुळे बालचमुंना एक चांगले प्रकारचे व्यासपीठ तांबे गुरुजी यांनी उपलब्ध करून दिले आहे.एक प्राथमिक शिक्षक मनात आणलं तर काहीही करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तांबे गुरुजी आहेत .ज्या क्षेत्रांमध्ये आपण कार्य करत आहोत त्याच क्षेत्रासाठी एक चांगले प्रकारचे कार्य ते करत आहेत .त्याचबरोबर मुधोजी महाविद्यालय फलटणचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर पवार सर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे . पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मुधोजी महाविद्यालय येथे सुरू केल्याबद्दल सर्वांचे कौतुक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख ,प्राचार्य गायकवाड साहेब ,मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर पवार सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.