बारामती :”ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून… कणा सारख्या अनेक ह्रदयस्पर्शी
व वास्तववादी परिस्थितीचे वर्णन करनाऱ्या कवितेचा अनमोल ठेवा रसिकांना देणारे कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन सर्वत्र मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने रागिणी फाऊंडेशन संचलित रेडिओ रागिणीवरून कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे रसग्रहण,सामाजिक व वास्तववादी साहित्य या बरोबरच मराठी या आपल्या मातृभाषेचे संवर्धन व महत्व,बोलीभाषेची भाषिक वैशिष्ट्ये,कवी मंगेश पाडगावकरांचे मराठी साहित्यातील योगदान,कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या शेतकरी जीवनावर भाष्य करणाऱ्या कविता,कथालेखिका वर्षा देशपांडे यांचा साहित्यप्रवास,सामाजिक जडण-घडणीतील बोलीभाषचे स्थान,मराठी संवर्धनातील युवकांची भूमिका अशा अनेक गोष्टीवर प्रकाश टाकणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण रेडिओ रागिणीवरून आज स. ९.०० ते दु.३.०० या वेळेत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ.रंजना नेमाडे (मराठी विभाग प्रमुख ),प्रा. डॉ सीमा नाईक -गोसावी ,प्रा. डॉ सुनील खामगळ ,प्रा डॉ. मुक्ता आंभेरे ,प्रा डॉ .संदीप तापकीर,प्रा राजकुमार तरडे यांच्या सह एम भाग १ व २ (मराठी ),एफ.वाय.बी.ए ,एम. एस्सी या वर्गातील विध्यार्थ्यानी सहभाग दर्शवला.”विद्यार्थ्यांना मराठी अभ्यासाची गोडी लागावी,लेखन कौशल्य,संहिता लेखन उत्कृष्टरित्या करता यावे,वाचन आणि सादरीकरण कौशल्य अधिकाधिक विकसित करता यावे” या उद्देशाने हा उपक्रम मराठी विभाग येथे राबविण्यात आल्याचे रेडिओ रागिणीच्या संचालिका राजश्री आगम यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .चंद्रशेखर मुरूमकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण व्ही.शांताराम.स्टुडिओ,टी. सी. महाविद्यालय येथे करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी प्रसारणासाठी पूजा बोराटे व श्रुतिका आगम यांचे सहकार्य लाभले.