आसू :- हणमंतवाडी ता.फलटण येथील वडाचीवाडी येथे काही मुलांना बिबट्या दिसला त्या नंतर त्या मुलांनी तेथील वनविभागाचे कर्मचारी यांना ती माहिती दिली तसेच परत रात्री उशिरा मुंजवडी ता.फलटण येथे ही बिबट्या दिसला असल्याने दोन्ही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत त्या कर्मचाऱ्याने व मुंजवडी च्या पोलीस पाटील यांनी तात्काळ वनविभागाला ही माहिती दिली त्या नंतर बुधवार दि.12 रोजी रात्री 10/11 च्या दरम्यान वनविभागाने त्या भागातील शेतकरी व इतर लोकांची विचारपूस केली व त्याठिकाणी असणारे ठसे घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
गेली अनेक दिवस फलटण शहरासह ग्रामीण भागात बिबट्या दिसण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र अनेक वेळा वनविभागाकडून तो बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले जात होते तथापि बिबट्या की तरस या बाबतीत मात्र अद्याप वनविभागाने ठोस पावले उचलली नाहीत. वडाचीवाडी व मुंजवडी येथे नक्की बिबट्या का तरस याबाबत वनविभागाने शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी करत आहेत. सोशल मीडियावर या भागात बिबट्या असल्याची पोस्ट फिरत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असून वनविभागाने या भागातील लोकांना अजून नक्की काहीच माहिती दिली नसल्याने फलटण तालुक्यातील पूर्व भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.