आसू/वार्ताहर-अजित निकम :- आसू-फलटण रोड हा सध्या चर्चेचा विषय बनला असून आसू -फलटण रोडच्या साईट पट्ट्यां नसल्याने अनेक अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या साईड पट्याच्या कामाबाबत पूर्णतः दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आसु फलटण या रस्त्यावर साईट पट्ट्यांच्या कामाकडे बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.संबंधित विभागाच्या चुकीच्या कामामुळे वाहनधारकांना त्रास होऊ लागला आहे. अनेक साईट पट्ट्यांच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . आसू-फलटण रस्ता हा पूर्णपणे रहदारीचा रस्ता असून या मार्गावरून फलटण पूर्व भागातून फलटण या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर मोठी वाहने मोठ्या प्रमाणात जात असतात. तर दुसर्या वाहनाला पुढे जाण्यास साईट पट्टीचा आधार घ्यावा लागतो परंतु या मार्गावर साईट पट्ट्यांचे तीन-तेरा वाजल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
काही ठिकाणी रोडला साईट पट्टी नसल्याने छोटे-मोठे अपघात नेहमीच होत आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच साईट पट्ट्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्याने आसू,पवारवाडी,गोखळी,खटकेवस्ती, साठे याठिकाणी जागोजागी साईट पट्ट्यांना खड्डे पडलेले आहेत. मात्र याची जाणीव संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला होत नाही. सदर रस्त्यावरील वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने आसू-फलटण रोडच्या साईट पट्ट्या त्वरित भरून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आसू-फलटण मार्गावरील साईट पट्ट्या चे काम लवकर होईल का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.