फलटण :- अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे आयोजित 29 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आले असून या सम्मेलनासाठी फलटण येथील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळ्देव येथील इयत्ता नववीतील बालकवी सुयश ताराचंद्र आवळे याची निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे.
या संम्मेलनासाठी राज्यातून सोळा बालकविंची निवड झाली आहे.हे साहित्य संमेलन सात व आठ फेब्रुवारी या दोन दिवशी संपन्न होईल. सदर सम्मेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे हे असून कवी सम्मेलन कोल्हापुरचे ज्येष्ठ कवी बाळ पोतदार यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.सुयश ताराचंद्र आवळे यांच्या या निवडीबद्दल फलटण नगर पालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ,ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रविंद्र बेडकीहाळ, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुभाष शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य संस्थेच्या अध्यक्ष संगीता बर्वे,उपाध्यक्ष माधव राजगुरु,बालसाहित्यिक न.म.जोशी मुख्याध्यापक रमेश जाधव,प्राचार्य सी.डी.ढोबळे तसेच साहित्य, सामजिक ,शैक्षणिक कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.