फलटण प्रतिनिधी – दैनिक पुण्यनगरीचे विडणी प्रतिनिधी सतिश कर्वे यांचे वडील कृष्णराव गोविंदराव कर्वे यांचे रविवार दि.९ फ्रेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
विडणी ता.फलटण येथील कृष्णराव गोविंदराव कर्वे यांचे आज पहाटे ४ वा.वृध्दापकाळाने वयाच्या ८६व्या वर्षी दुःख निधन झाले.फलटण तालुक्यात चाळीस वर्षे विविध कार्यकारी सहाकरी सोसायटी मध्ये एक आदर्श सचिव म्हणून सेवा बजावली होती मुले देखील त्यांनी उच्च शिक्षीत शिक्षण दिले असून एक मुलगा पञकार क्षेत्रात पञकार म्हणून काम करीत आहे तर दुसरा फियाट सारख्या इंटरनॅशनल कंपनीत उच्च पदी आहे.
त्याच्या मनमिळावू स्वभावाने अनेकांचा त्याचा परीचय होता त्याच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्याच्या राहत्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या पार्श्वदेहाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहीली व शोक व्यक्त केला. त्याच्या पश्च्यात पत्नी दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे. सावडण्याचा विधी मंगळवारी दि. ११ रोजी सकाळी ८.३० वा.होणार आहे.