आ.एस.ओ. मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथ .शाळा कारंडेवस्ती ( मलवडी ) केंद्र – बिबी. या शाळेत भाजी मंडई भरविण्यात आली. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी व शेतात पिकवलेल्या मालांची खरेदी-विक्री कशाप्रकारे करायची याचे ज्ञान मिळण्यासाठी सदरचा उपक्रम घेण्यात आल्याचे व भविष्यात शाळेच्या परस बागेतील जास्तीचा भाजीपालाही वस्तीवर विक्रीसाठी आणण्यात येईल ,असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन बोबडे सर यांनी सांगितले, यावेळेस बिबी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गजानन शिंदे साहेब उपस्थित होते.त्याचप्रमाणे सदर मंडईमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ ,पालक, माजी विद्यार्थी ,यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला या वेळेस पुढील वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने
भाजीपाला -मेथी, कांदा, मिरची, कांदापात, काकडी, शेवगा, लिंबू, कोथींबीर, टॉमॅटो, गवार, कडीपत्ता,
फळे- पेरू, चिक्कू, अंडी स्पेशल खाऊ – मिसळपाव, इडलीसांबर, वडापाव, बिस्कीट चहा इ.स्वच्छ, सुंदर, निवडक, ताजे, पदार्थ व भाजीपाला विदयार्थ्यांनी भाजी मंडईत आणला होता. या भाजी मंडईत एकूण आर्थिक उलाढाल ६७९५ /-रुपयांची झाली. सदरच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.