फलटण:1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत श्रीमंत शिवाजीराजे क्रीडानगरी घडसोली मैदान येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मोठ्या उत्साहात संपन्न होणार असलेल्या 65 राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेनिमित्त फलटणकर यांनी केलेल्या जय्यत तयारीची पाहणी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी क्रीडांगणावर जाऊन केली. तसेच याप्रसंगी युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे स्वागत फलटण तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव व खंडाळा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी केले
६५ व्या शालेय खो-खो स्पर्धेमध्ये देशभरातून ३० मुलांचे व ३० मुलींचे ६० संघ म्हणजेच ९०० ते १००० खेळाडू, २५० क्रीडा मार्गदर्शक ,१०० पंच यानिमित्ताने फलटण येथे येत असून खेळाडूंची निवासाची व जेवणाची उत्तमअशी सोय करण्यात आली आहे. सरावासाठी लागणारी २ मैदाने व स्पर्धेसाठी ४ मैदाने तयार करण्यात आलेली आहेत. तसेच खो-खो खेळाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे तसेच चाळीस फूट लांबीचे भव्य व्यासपीठही उभारण्यात आले आहे तसेच संध्याकाळच्या सत्रात काही सामने खेळवले जाणार असून लाईटची सुंदर अशी सोय टॉवरच्या माध्यमातून करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या मुलांसाठी व मुलींसाठी बैठक व्यवस्थाही सुंदर करण्यात आली आहे सर्व कामे पूर्ण झालेली असून मैदानातील कामाची पाहणी करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व व फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे साहेब यांनी क्रीडांगणावर जाऊन मार्गदर्शन व पाहणी केली. तसेच याप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “६५ वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटण नगरपरिषद, फलटण यांच्या वतीने रु.५ लक्ष निधीचा चेक जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा मा.श्री.युवराज नाईक यांना सुपूर्द केला मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून फलटणमधील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडानगरी देशाला उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू मिळवून देईल फलटणचे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल असे उद्गार काढले याप्रसंगी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे श्रीमंत रामराजे युवा मंच चे अध्यक्ष राहूल भैया निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी क्रीडांगण, प्रेक्षक गॅलरी,भव्य व्यासपीठ व लाईटचे कामासंदर्भात व नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत श्रीमंत शिवाजीराजे क्रीडानगरीचे नाव देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल असे मत व्यक्त केले
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य, आ.दिपकराव चव्हाण साहेब ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, मा श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे उदगार फलटण तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव व खंडाळा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी काढले.
याप्रसंगी क्रीडांगणावर खोखो असोसिएशनचे जिल्हा सचिव महेंद्र गाढवे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन,शिवाजीराव घोरपडे, विविध समित्यांचे विभाग प्रमुख उपस्थित होते मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य खुरूंगे सर, महाराष्ट्र संघाच्या मुले आणि मुली यांचे प्रशिक्षक प्रशांत व गुरूदत्त चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक सचिन धुमाळ तसेच तुषार नाईक-निंबाळकर प्रसिद्धी विभाग प्रमुख अमोल नाळे,प्रवीण काकडे, ज्येष्ठ खोखो खेळाडू नजीरभाई शेख, आप्पासाहेब खानवीलकर, रत्नसिंह नाईक-निंबाळकर, आप्पासाहेब पवार, राहूल निंबाळकर, घोरपडे सर, बोंद्रे सर, तुषार मोहिते, किरण विचारे, काकडे सर ,स्वप्नील पाटील, सुहास कदम, रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल नाईक निंबाळकर, कुमार पवार, सतीश नाळे, अमित काळे, दत्तात्रय जाधव, अविनाश गंगातीरे, महेश सुतार, सुरज ढेंबरे संभाजी जाधव, मनोज कदम, आदी मान्यवर उपस्थित होते