फलटण: निर्यात क्षेत्रातील जगप्रसिध्द कंपनी के बी एक्सपोर्टस येथे 2020 चा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे यावेळी के बी एक्सपोर्टस च्या प्रजासत्ताक दिनाला कॉम्रेड भारत पाटणकर व जगप्रसिद्ध लेखिका गेल ओमेडवेत हे प्रमुख पाहुणे होते.
मा. श्री भारत पाटणकर यांनी सुरवातीलाच आपल्या भाषणात ते इतर कंपनी च्या कार्यक्रमास जात नसलेचे सांगून के बी एक्सपोर्टस ही कंपनी प्रजासत्तक पद्धतीने व नवीन तंत्रज्ञान चा वेध घेत उद्योगा ची भरभराट करीत कर्मचारी व शेतकऱ्यांना समृद्ध बनवणारी कंपानु असल्या मुळे आमंत्रण स्वीकारलेचे सांगितले. एवढेच न्हवे तर कंपनी मधील शेवटच्या घटकात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे गुण ओळखून त्याना विभाग प्रमुख करण्याचे महान कार्य कंपनी च्या डायरेक्टर मा. श्री सचिन यादव यांनी केलेचे त्यांनी आवर्जून सांगितले व त्या बद्दल व्यक्तिशः माहिती त्यांनी घेतली.
त्याच बरोबर कंपनी च्या इतर शेतकरी हिताचे बायो पेस्टीसाईड येत असले बद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.
आभार मानत असताना कंपनी चे डायरेक्टर मा. श्री सचिन यादव यांनी मा श्री भारत पाटणकर यांच्या सारखे व्यक्तिमत्व शतकात एकदाच होत असलेचे नमूद करून , कंपनी इथून पुढे ही सामान्य आणि शेतकरी हिताचे निर्णय घेत राहील या बद्दल ग्वाही दिली. कंपनी मध्ये डायरेक्टर म्हणून काम करीत असताना कंपनी ला व कर्मचारी वर्गास कुटुंब मानल्या मुळे व कर्मचारी वर्गाने ही पालकांचा मान दिले मुळे कंपनी अल्पावधीत अनेक क्षेत्रात भारतातील क्रमान 1 ची कंपनी बनल्याचे सांगितले. कंपनी च्या उपक्रम पैकी गैलेक्सी कॉ ऑप क्रेडीट सोसायटी मधून तात्काळ कर्ज सेवा उपलब्ध असलेचे ही सांगितले व व्यापारी वर्गाला समृद्ध करणारी गोल्ड सी सी चा फायदा घेण्याचे आवाहन केले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते एम्प्लॉयी ऑफ द इयर, व इतर अनेक पुरस्कार कर्मचारी व अधिकारी वर्गास देण्यात आले. त्यावेळी डायरेक्टर मा. सचिन यादव यांचा ही उदयोग भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल शेतकरी वर्गा कडून प्रतिमात्मक बैल गाडी आणि शेतकरी चे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास हजारो शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्तिथ होता.