फलटण : वृत्तपत्र विक्रेता यांची एकमेव शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २६ व २७ जानेवारी रोजी शांतिनिकेतन सांगली येथे आयोजित केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देेण्यात आली आहे.
सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सदर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्धाटन जलसिंचन मंत्री जयंतराव पाटील कामगार जलसंपदा व शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई कृषी व सहकार मंत्री विश्वजित कदम दै. पुढारी संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव खा. संजय पाटील आ. सुधीर गाडगीळ आ. संजय केळकर आ. सुरेश खाडे आ. मोहनशेठ कदम आ. विक्रम सावंत सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप पाटील महापौर संगीता खोत श्रीमती जयश्रीताई पाटील वसंतदादा साखर कारखाना चेअरमन विशाल पाटील जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच परिसंवाद वृत्तपत्र दिंडी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. .
राज्यस्तरीय अधिवेशनात रविवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील विक्रेते यांचे आगमन व नोंदणी केली जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता केंद्र समिती बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कार्य समिती बैठक ६ वाजता सर्वसाधारण सभा संध्याकाळी ७.३० वाजता मुक्त चिंतन व चर्चा होणार असून रात्री भोजन व रात्री १० वाजता मनोरंजन कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वृत्तपत्र दिंडी व ध्वजारोहण करण्यात येणार आहे. नंतर ११ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
राज्य अधिवेशनात मा. आ. संजय केळकर दै. पुढारी संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव सहाय्यक कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर व मनिष पुराणिक यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दुसरे सत्रात दूपारी २. ३० ते ४ या वेळेत वृत्तपत्र व्यवसाय काल आणि आज व वृत्तपत्र विक्रेता या विषयावर व्याख्यान होणार आहे. यामध्ये दै. लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंत भोसले अध्यक्षस्थानी राहणार आहेत.ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर मंजुनाथ पाटील दिनेश कुडचे सुनिल पाटणकर पदनाभ पवार हे सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता कष्ट करणारा
विक्रेता वृत्तपत्र प्रामाणिकपणे काम करतो तसेच अंक विक्री विक्रेता करतो याची जाणीव ठेवून त्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न समजून घेणेसाठी राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षी आयोजित केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता यांच्या मागण्या ৭) वृत्तपत्र विक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. २) पेन्शन आरोग्य, शैक्षणिक आधी योजना ताबडतोब लागू करााव्यात.३) वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघटीत कामगार म्हणून शासनाकडे नॉंदी सुरु करायच्त.४) मोक्याच्या ठिकाणी गटई कामगार प्रमाणे पेपर स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. ५) शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोठा ठेवावा. ६) वृत्तपत्र विक्री व्यवसायाला आवश्यक असणारे, अच्छादीत स्टॉल, सायकल, रेनकोट, स्वेटर इत्यादी साहित्य मिळावे. ७) विपरीत परिस्थितीत कर्तव्य पार पाडत असल्याने निर्माण होणाार्या आजारपणात वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेस, मेडीक्लेम सुविधा उपलब्ध व्हावी. ८) ग्रामीण भागात वृत्तपत्र एजंटांना वृत्तपत्राच्या बिलाची वसुली करताना होणारी दादागिरी थांबवण्यासाठी उपाय योजना करावी. ९) जिल्ह्याच्या प्रत्येक शहरात वृत्तपत्र वितरणासाठी सांगलीच्या धरतीवर विक्रेता भवन उभा करण्यात यावे. १०) ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकारी यांना रेल्वे व एस.टी.मध्ये मोफत प्रवास मिळावा. यावर चर्चा होणार आहे.
या अधिवेशनामध्ये विक्रेते वत्तपत्र कल्याणकारी समिती राज्याचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार कार्याध्यक्ष सुनील पाटणकर सरचिटणीस बालाजी पवार सल्लागार शिवगोंड खोत गोरख भिलारे विकास सुर्यवंशी रघुनाथ कांबळे मारुती नवलाई आण्णा गुंडे राजेंद्र माळी विकास पवार गणेश गांधी चंद्रिका राणे याच्यासह राज्यातील व सांगली जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता अधिवेशनात विक्रेता यांची राहणे भोजन चहा नाष्टा वगैरे सोय केली असुन या राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता अधिवेशनास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.