आसू : फलटण पंचायत समिती सभापती व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर तथा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांचा वाढदिवस उद्या शनिवार दि. 25 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त सकाळी भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ. दिव्यांजलीराजे खर्डेकर औक्षण करतील, ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिरात अभिषेक केल्यानंतर सकाळी 9 रक्तदान शिबिराचे उदघाटन, सकाळी 10:30 वाजता दिनदर्शिकेचे प्रकाशन, सकाळी 10:45 वाजता साप्ताहिक फलटण रक्षक विशेषांकाचे प्रकाशन, सकाळी 11 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसू ता. फलटण येथील शाळेमध्ये शालेय साहित्य व खाऊ वाटप, दुपारी 12 गुंतवणुक रहस्य या विषयावर व्याख्यानालेस उपस्थित राहणार आहेत.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर हे दुपारी 4.30 वाजता आसू ता. फलटण येथील एस. टी. स्टण्ड परिसरात वृक्षारोपण करणार असून सायंकाळी 6:30 बॉडी शो स्पर्धा समारंभास उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 या वेळेत आसू येथील निवासस्थानी शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी श्रीमंत शिवरुपराजे उपलब्ध होणार आहेत.