25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय मतदार दिवस

फलटण : शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम 255 फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघात राबविणेत येणार असून नवीन मतदार नोंदणी, मतदानासंदर्भात मतदारामध्ये जागृती करणेसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
सशक्त लोकशाहीसाठी मतदार साक्षरता (एश्रशलीीेंरश्र ङळींशीरलू षेी डीीेंपसशी ऊशोलीरलू ) अशी यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार दि. 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यामुळे हा दिन राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा केला जातो.
राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम शनिवार दि. 25 जानेवारी रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करणेत येत असूूून मतदार दिनाचे अनुषंगाने शपथ घेण्यात येणार आहे तसेच फलटण शहरातून प्रभात फेरी काढण्याचे नियोजन केले आहे. त्याच ठिकाणी मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदार दिवस साकारला जाणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचे निमित्ताने सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी, शाळा, महाविद्यालये व सर्व शासकीय कार्यालयात शपथ घेणेत येणार आहे. दि. 25 जानेवारी रोजी शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी असलेने अशा कार्यालयात दि. 24 रोजी शपथ घ्यावी असे आवाहन प्राताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
255 फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहुन दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकानुसार ज्यांचे वयास 18 वर्षे पूर्ण होतात असे नवीन मतदार, महिला, अंध, अपंग यांचेकडून नमुना नं.6 चे फॉर्म भरुन घेतले जाणार आहेत. मोबाईल अ‍ॅप बाबत माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने मतदार कडून शपथ घेणेत येणार आहे.
सर्व मतदारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन 255 फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण शिवाजीराव जगताप, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रभारी तहसिलदार फलटण आर. सी. पाटील यांनी केले आहे.
मतदान दिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवार दि. 23 रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे रंगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सानिया शेख, श्रीपाद शिंदे, बोथेकर, मिनल गायकवाड, ज्योती भिसे, प्रियांका राउत, ओंकार पिसे, आरती गायकवाड, अमोल कोळेकर, कु. सोनवलकर, ओंकार पवार यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला त्यापैकी वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक कु. सानिया शेख, अक्षता मुळीक व अक्षता आळंदे द्वितीय क्रमांक विभाग आणि प्रतिक बनकर यांस तृतीय क्रमांक तसेच रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक कु. पूजा खिलारे व चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक कु. काजल ढेबरे यांना देऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ सुधीर इंगळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. बी. ठोबरे, निवडणूक शाखेतील अव्वल कारकून अनपट, दैनिक ऐक्यचे मुगुटराव कदम, स्पर्धा समन्वयक प्रा. मदन पाडवी, परीक्षक प्रा. डॉ. बाळासो कांबळे, कृषी सहाय्यक सचिन जाधव उपस्थित होते.
समारोप व आभार प्रदर्शन प्रा. जयश्री शेंडे यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!