बालक कु. अथर्व मनोज लोहार १० वर्षीय तबला वादनातील एक अद्वितीय शक्ती

फलटण : कोळकी येथील सुपुत्र व सध्या अंबरनाथ येथे राहत असलेला कु. अथर्व मनोज लोहार (वय १०) या बाल तबला वादकाची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड होवून बुधवार दि. २२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथील समारंभात राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येवून गौरव करण्यात आला आहे. कु. अथर्व मनोज लोहार याचा राष्टीय पातळीवर गौरव झालेबद्दल त्याचेवर सर्व स्तरातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्यावतीने कु. अथर्व मनोज लोहार याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या समारंभानंतर दि. २३ व दि. २६ जानेवारी रोजी संचलनात कु. अथर्व मनोज लोहार सहभागी होणार आहे.
स्थानिक जिल्हा व राज्यस्तरावर कु. अथर्व मनोज लोहार याने तबला वादक म्हणून आपली कला सादर केली आहे. कु. अथर्व मनोज लोहार याने आजपर्यंत नवी दिल्ली मुंबई पुणे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत सहभाग घेतला असून त्याने १ आंतरराष्ट्रीय व ८ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळविली आहेत. २०१५ साली कु. अथर्व मनोज लोहार याने थायलंड बँकांक येथील आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले आहे. मुंबई आकाशवाणी केंद्र राष्ट्रीय कला मंच व महाराष्ट्रातील ६० हून अधिक ठिकाणी आपल्या तबला वादनाने रसिकांची मने जिंकली आहेत. त्याने तबला वादनात सवोकष्ट वादनाचा सन्मान प्राप्त केला आहे.
कु. अथर्व मनोज लोहार याने तबला वादनाचे प्रशिक्षण अंबरनाथ येथील गुरु सुनील शेलार यांच्याकडे घेतले आहे. 
देशातील सर्वच वर्तमानपत्रात अथर्वला देशाचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचे हस्ते पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य त्याचे कलेमुळे प्राप्त झाले असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. 
  कु. अथर्व मनोज लोहार याच्या या अतुलनीय यशामधे त्याचे आजी, आजोबा, आईवडील, काका काकु, आत्या, मामा, मामी, भाउ बहिण, आप्तेष्ठ नातेवाईक व लोहस्कांर संपादक हनुमंतराव चव्हाण फलटण यांचा सहभाग मोलाचा आहे.
कु. अथर्व याचा जन्म दि. २३ जानेवारी २०१० ला फलटण तालुक्यातील मुळ गावी कोळकी जि. सातारा येथे झाला असून हल्ली तो अंबरनाथ जि. ठाणे येथे राहत आहे. आजोबा लक्ष्मणराव लोहार (टिंगरे) सैनीकी सुभेदार, वडील रेल्वे पोलीस, काका अजय  पोलीस, मोठे काका पोलीस निरिक्षक आहेत. 
   कु. अथर्व  एक ते दिड वर्षाचा असताना घरच्या सर्वाचाच लाडका आहे. त्यांचे पाय पाळण्यात दिसले. अथर्व याच्या बोटाच्या सुसंगत हलचाली कधी गुडघ्यावर तर कधी टेबलावर, भांड्यावर, ताटावर तर कधी आईवडीलांच्या डोक्यावर दिसू लागल्या होत्या. 
  संपूर्ण  लोहार परिवार बुध्दिजीवी असल्याने अथर्वाची तबला वादनाची सुप्त शक्ती लगेच हेरली गेली आणि ही शक्ती पकडली गेली. आत्या, मामा महादेव गंगाधर वसव यांनी पंढरपुरहून आणलेला तबला अथर्वास सप्रेम भेट दिला.
   गरूवर्य सुनील शेलार सर अंबरनाथ यांचे मार्गदर्शनाखाली कु. अथर्व मनोज लोहार याचे तबला वादनाचे धडे सुरू झाले. सरांनीही अवलिया अथर्वला धडे  देण्यास कसर बाकी ठेवली नाही.
  वयाच्या ५ व्या वर्षी म्हणजे  २०१५ सालापासुन अथर्व लोहार याचा थक्क करून सोडणारा प्रवास सुरू झाला. सिध्दी विनायक ट्रस्ट मुंबई यांच्या सतत होणार्या तबला वादन स्पर्धा, स्वामी समर्थ अक्कलकोट ट्रस्ट यांच्या दर २ महीन्यांनी होणार्या स्पर्धा व गणपती पुळे येथील दर वर्षी हाणार्या  स्पर्धा चांगल्याच अंगवळणी पडल्या आणि अथर्व प्रकाश झोतात आला.
     वयाच्या ७ व्या  वर्षी २०१७ मधे कु. अथर्व मनोज लोहार याने थेट थायलंड येथे स्पर्धेसाठी जावून पहिल्या नंबरची विरश्री व रोख पारितोषक  खेचुन आणले आणि भारत देशाचे नाव अधोरेखीत केले. कु. अथर्व मनोज लोहार  ८ व्या वर्षी २०१८ मध्ये शिर्डी येथे दोन वेळेस जाऊन प्रथम क्रमांकाची स्पर्धा गाजवली. ९ व्या वर्षी २०१९ मधे मुंबई आकाशवाणी वरील अथर्वचे तबला वादन चांगलेच गाजले. वयाचे १० व्या वर्षी उत्तरप्रदेश लखनऊ येथे तबला वादन स्पर्धा करुन अखिलेश यादव यांचे हस्ते गौरव व रोख १०,०००रूपये पारितोषक मिळविले.
   याचाच परीपाक म्हणून कु. अथर्व मनोज लोहार नंबर १, राष्ट्रीय पातळीवर दखल आणि दि. २२ जानेवारी २०२० रोजी थेट देशाचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांचे हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार  व १ लाख रूपये रकमेसह प्रदान करण्यात येवून आता  प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात सहभागी होण्याचा मान प्राप्त केला आहे. 
   कु. अथर्व याने भारत देशाचे, महाराष्ट्राचे, सातार्याचे, फलटणचे व कोळकी येथील लोहार(टिंगरे) परिवाराचे आणि लोहार समाजाचे नाव रोशन केले आहे.  
   अद्वितीय शक्ती म्हणून अथर्व नेहमीच समाजाचे प्रेरणास्रोत राहील.आजचा दिवस लोहार समाजासाठी उत्सव पर्वणीच म्हणावा लागेल. 
भारत देश कु. अथर्व मनोज लोहार याचा राष्ट्रीय बाल पुरस्कारमुळे वाढदिवस साजरा करत आहे. कु. अथर्व मनोज लोहार याचा आज दि. २३ रोजी दिल्ली येथे केंद्रीय बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला आहे. त्यास वाढदिवसानिम्मिताने अनेक शुभेच्छा!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!