पुणे प्रतिनिधी:- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फॉउंडेशन, पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे प्रथमच ब्राम्हण कुटुंबात महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यसोधक पध्दतीने सत्यशोधक अॅड.सिद्धार्थ विठ्ठलराव लिखिते,एल एल एम,लंडन स्थायिक (पुणे ) आणि सत्यशोधिका कवल प्रित कौर, लुधियाना ,पंजाब उच्चशिक्षित वधु वर यांचा पुणे येथील श्रृती मंगलकार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वेला दि.25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता. होणार आहे, हा सत्यशोधक विवाह विधिकर्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे चे माजी शहराध्यक्ष व महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशनसमिती,
महाराष्ट्र शासन चे माजी सदस्य आणि संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांचे वेशभुषेत तर प्रा.गायत्री लडकत ह्या सावित्रीबाई फुले यांचे वेशभुषेत सहकारी हनुमंत टिळेकर,प्रा.सुदाम धाडगे यांचे सोबत मराठी,हिन्दी आणि इंग्रजी भाषेत लावणार आहेत अॅड.सिद्धार्थ लिखिते ,लंडन येतून नुकतेच आलेले असुन त्यांनी प्रथम लाल महालात माता जिजाऊ यांचे आणि छत्रपती बाल शिवाजी यांचे पुतळ्यास तसेच महात्मा फुले वाडा,समताभूमी येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे पुतळ्यास आई समवेत पुष्पहार अर्पण करून सत्यसोधक विवाहाची प्रथम पत्रिका ठेवली.नंतर सगे सोयरे यांना पत्रिका देणेस सुरुवात केली. या वेळी पुणे विध्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे,कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे , कुलसचिव सुनील रेडेकर ,रघुनाथ ढोक व इतर मान्यवर उपस्थित होते. हा सत्यशोधक विवाह रजि.पद्ध्तीने १३ वा होणार असुन विवाह लावले नंतर दोघांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र मान्यवरांचे शुभहस्ते दिले जाणार आहे.
यावेळी डॉ .देवीसिंह शेखावत ,पंडीत वसंतराव गाडगीळ व अनेक मान्यवर मंडळी, न्यायाधीश, वकील, परदेशी मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत.. या सत्यशोधक विवाहासाठी महा.राज्याचे अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री व नाशिक चे पालक मंत्री ना.छगन भुजबळ , माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि डॉ .देवीसिंह शेखावत तसेच खासदार डॉ श्रीनिवास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रिका व मुहूर्त न पहाता हा सत्यशोधक विवाह होणार असल्याने सर्व लहान थोर मंडळीनी आधुनिक काळाची गरज म्हणून या विवाहाचे अनुकरण करावे असे लंडन हून खास पुण्यात येऊन सत्यशोधक विवाह करणारे अॅड.सिद्धार्थ लिखिते आणि त्यांचे परिवाराची ईच्छा आहे. हा विवाह आंतरराष्ट्रीय ,आंतरराज्यीय ,आंतरधर्मीय ,आंतरजातीय पहिला सत्यशोधक पद्ध्तीने होत आहे.