फलटण- ६ जानेवारी पत्रकार दिनाचे निमित्त साधून फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने भव्य दिव्य *पत्रकार चषक २०२०* या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन शुक्रवार दि. १७ ते दि.२१ पर्यत घडसोली मैदान येथे करण्यात आले होते.
आज मंगळवार दि.२१ रोजी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळविण्यात आले. अंतिम सामना अकलुज-११ विरूध्द माण किक्रेट संघ यांच्या मध्ये रंगला या अटीतटीच्या सामन्यात अकलुज इलेव्हन या संघाने हा सामना जिंकून सन-२०२० पत्रकार संघाचा मानकरी ठरला विजयी संघास सत्तर हजार एक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. द्वितिय क्रमांकाचे ५०००१/रू व चषकाचे बक्षिस माण संघास तरतृतिय क्रमांकाचे बक्षिस ३०००१रू व चषकाचे बक्षीस नातेपुते संघ व गिरवी संघास विभागून देण्यात आले. बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शक रविंद्र बेडकिहाळ , जेष्ठ पत्रकार तथा महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, फलटणचे नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, युवा नेते ऋषीराज निंबाळकर, युवा नेते रणजितसिंह भोसले,फलटण नगर परिषदेचे नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, माजी नगरसेवक अभिजित भोसले, भाजपाचे बजरंग गावडे, अमीरभाई शेख, काकासो खराडे, अमोलशेठ सस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
या स्पर्धेसाठी दै.स्थैर्यकार स्व. दिलीपराव रूद्रभटे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज स्व भालचंद्र देशपांडे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच स्व दिलीपराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅटमनस अवॉर्ड देण्यात आले असून याच बरोबर बेस्ट बॉलर असे वैयक्तिक बक्षीसे हि देण्यात आली.
या सामन्यासाठी महाबळेश्वर नगर परीषदेच्या *अध्यक्षा स्वप्नालीताई शिंदे व कुमारशेठ शिंदे* यांचे विशेष सहकार्य लाभले
यावेळी फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमी यावेळी उपस्थित होते.यावेळी पत्रकार स. रा. मोहिते, युवराज पवार, यशवंत खलाटे, विक्रम चोरमले, शक्ति भोसले, सतीश कर्वे, विजय भिसे, प्रशांत रणवरे, अनिल पिसाळ,अजित निकम, वैभव गावडे, अमोल नाळे, प्रवीण काकडे, दिपक मदने, रोहीत वाकडे, व इतर पत्रकार यावेळी उपस्थित होते.