फलटण : भारतीय संस्कृती जपत राष्ट्रीय पेय म्हणून ओळख असलेल्या चहाला सर्वांची पसंती तर असतेच आणि घरी आलेल्या पाहुण्यांना आदरातिथ्य म्हणून चहा आदराने दिला जात असल्याचे अहिल्या क्रांती सेने च्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी सांगितले.
फलटण येथे पै. बजरंग गावडे यांनी सुरु केलेल्या जय मल्हार सेंद्रीय गुळाचा चहा शाॅपीला अहिल्या क्रांती सेने च्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी सदिच्छा भेट दिली.
भारत देशाची कषी प्रधान असलेली ओळख जपून ती वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी यांच्यासह अनेकांनी केला आहे. चहा म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते ही गोष्ट जाणून पै.बजरंग गावडे यांनी सुरु केलेला सेंद्रिय गुळाचा चहा फलटणकर नागरिक यांच्या पसंतीस उतरेल अशा शुभेच्छा अहिल्या क्रांती सेने च्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी यांनी दिल्या.
प्रारंभी पै. बजरंग गावडे व रोहन गावडे यांनी कल्याणी वाघमोडे व डॉ. वाघमोडे यांचे स्वागत केले.
कल्याणी वाघमोडे यांनी जय मल्हार गुळ काकवी चहा शाॅपीला भेट देवून सेंद्रिय गुळाचा चहाचा आस्वाद घेतला व गुळ काकवीची आपल्या लहान मुलांसाठी खरेदी केली.
यावेळी डॉ. वाघमोडे मोनू शिंत्रे रोहन भैय्या गावडे व पै. बजरंग गावडे उपस्थित होते.