महिला ह्या अतिशय सहनशील असून महिलांनी अन्याय सहन करू नये : सौ. रुपालीताई चाकणकर

फलटण : महिलांमध्ये सहन करण्याची ताकद असली तरी महिला ह्या अतिशय सहनशील असून महिलांनी अन्याय सहन करू नये असे आवाहन करतानाच
महिलांचे सबलीकरण आणि त्यांना सक्षम करण्यासाठी मला बोलावे लागते परंतु त्याबाबत सर्व योजना फलटणमध्ये सुरू असल्याने मला बोलण्यासाठी आता काही उरले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी केले.
फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित महिला संवाद मेळाव्यात सौ. चाकणकर बोलत होत्या. यावेळी  श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ. नीता नेवसे, सौ. रेखा खरात, सौ. रेश्मा भोसले, सौ. मेघा सहस्त्रबुद्धे, सौ. रेश्मा देशमुख, सौ. सुनंदाताई जाधव, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. वैशाली चोरमले, सौ. वैशाली अहिवळे, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. लतिका अनपट, सौ. भावना सोनवलकर, सौ. कांचन निंबाळकर, सौ. सुनीता मोरे, सौ. अनघा कारखानीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
 महिलांच्या आरोग्यासाठी फलटण शहर व तालुक्यात सॅनिटरी नॅपकिनचे मशीन घेवून सॅनिटरी नॅपकिन दरमहा येथील विद्यार्थी, युवती व महिलांना देण्यात यावेत. अत्यंत कमी दरात किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन दरमहा देण्याचा उपक्रम सुरू करावा असे आवाहन सौ. रुपालीताई चाकणकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. खा. शरदराव पवार साहेबांनी घेतलेले कष्ट कधीही विसरता येणार नाहीत. सहन करण्याची ताकत महिलांमध्ये असली तरी महिलांनी अन्याय सहन करू नये. आयुष्याच्या शेवटच्या भागात तू माझ्यासाठी काय केलं ? असे प्रश्न मुलांना उपस्थित करू देवू नका. महिलांनी स्वावलंबी बना. पुरोगामी विचारांचा स्वीकार करा. वंशाचा दिवा हवा म्हणून मुलींची संख्या कमी झाली असल्याचे सौ. चाकणकर यांनी स्पष्ट केले.
 राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये काम करत असताना महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात व महिलांचे जीवनमान मजबूत करण्यासाठी आपण नक्कीच कार्यरत राहू. खा. शरदराव पवार साहेबांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. महिलांना आरक्षण फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळे मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला सेल अतिशय मजबुत आहे. चाकणकर मॅडम अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवली असल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटणची जी माती आहे ती ऐतिहासिक माती असुन माणसांवर प्रेम करणारी पवित्र माती आहे. फलटणची माणसं ही अतिशय धोरणी माणसं आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे भगीरथ आहेत. नाईक निंबाळकर घराणे तालुक्यातील माणसांना उभारी देणारे आहे. फलटणच्या राजांचे राजे पण काल पण, आज पण आणि उद्या पण हे इथं आल्यावर जाणवत असल्याचे कविता म्हेत्रे यांनी सांगितले.
उपसभापती सौ. रेखा खरात, तरडगावच्या सरपंच सौ. जयश्री चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी फलटण तालुका अध्यक्षा सौ. रेश्मा भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांचे गौरव यावेळी करण्यात आला. फलटण तालुक्यात राज्यातील पहिले मुलींचे सैनिक स्कुल व्हावे अश्या आशयाचे निवेदन फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व महिलांच्यावतीने सौ. समृद्धी नितीन भोंग यांनी दिले.
प्रास्तविक सौ. लतिका अनपट यांनी केले तर  सौ. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील तरुणी विद्यार्थीनी महिला उपस्थित होत्या.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!