फलटण शिवाजी विद्यापीठ, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभागामार्फत मौजे राजुरी ता.फलटण येथे सुरू असलेल्या विशेष श्रम संस्कार शिबिरात करिअर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
13 जानेवारी 2020 पासुन मौजे राजुरी येथे सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात विविधउपक्रम राबविण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थींना करिअरच्या वेगवेगळ्या वाटा माहित व्हाव्यात यासाठी जय हो करिअर अॅकँडमीचे प्रा.संदीप जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सरांनी करिअर करण्यासाठी असलेल्या अनेक संधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली, तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जे कराल ते सर्वोत्कृष्ट करण्याचा मुलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी शिबीराचे नेटके संयोजन केल्या बद्दल प्रा.गवळी, उपप्राचार्य ठोंबरे सर , प्राचार्य डॉ.अरूण गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गोडसेसर यांनी केले , अध्यक्ष स्थान जयकुमार इंगळे यांनी भुषविले व आभार सतीश पवार यांनी मानले या कार्यक्रमाला शिबीरार्थीं व राजुरी गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.