फलटण : ऐतिहासिक संस्थान म्हणून परिचित असलेल्या फलटण शहराच्या हेपिनेस इंडेक्समध्ये योगदान देऊ शकतो हे ओळखून गोविद मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्ट्स व कला प्रसारक संस्थेच्या माध्यमातून संस्थान हेरिटिज सगीत महोत्सवाचे आयोजन मुधोजी हायस्कूल रंगमंच फलटण येथे रविवार दि २६ जानेवारी २०२० रोजी
सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत केले आहे.
गौरवशाली इतिहास व ऐतिहासिक परंपरा असलेल्या फलटण शहराला कलेचा समुद्र वारसा लाभला आहे. फलटण शहर कालसुसंगत योग्य रीतीने वाढत आणि बदलत आहे. बदलती कलामुल्य व रंजनप्रियता लक्षात घेता फलटण नगरीतील रसिक व प्रेक्षकांची
कलाभिरुचीही अधिक संपन्न व समूद्ध होणे आवश्यक आहे म्हणूनच मोठ्या प्रमाणात लोकसहभाग असलेला संगीत महोत्सव शहराच्या हॉपिनेस इंडेक्समध्ये योगदान देऊ शकतो हे ओळखून गोविद मिल्क अंड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. फलटण यांनी संस्थान हेरिटिज संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कला
प्रसारक संस्थेच्या माध्यमातृन या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
सुरुवातीला एक दिवसाचा असणारा हा कार्यक्रम पढे अधिक मोठा होत जाईल. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यानिमित्ताने फलटण शहर आणि परिसरातील रसिकांचे मनोरंजन करतील. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत राहणार आहे.
पहिला संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव मुधोजी हायस्कूल रंगमंच फलटण येथे दि २६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत संपन्न होणार आहे.
आधुनिक श्रीकृष्ण अशी ओळख असलेले जगद्धिख्यात बासरी वादक अमर ओक यांच्या एकल बासरी वादनाने या कार्यक्रमाचे पहिले सत्र रंगणार असुन यानंतर सप्रसिद्ध सुगम व शास्त्रीय गायक राजेश दातार रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. राजेश दातार गात असताना त्याची आणि अमर ओक यांची जुगलबंदीही फलटणकर रसिकांसाठी विलक्षण अनुभूती देणारी पर्वणी ठरणार आहे.