पञकार दिनाचे औचित्य साधून फलटण येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

फलटण :- ६ जानेवारी पञकार दिनाचे औचित्य साधून फलटण शहर व तालुक्यातील पञकारांच्या वतीने भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आसून शुक्रवार दि 17 रोजी सकाळी 10 वाजता घडसोली मैदान येथे  उदघाटन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना.निबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती जेष्ठ पञकार रविंद्र बेडकिहाळ यांनी दिली.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या फलटण शहर व तालुक्यातील पञकारांच्या वतीने विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबवित असतात याचाच एक भाग म्हणून “पत्रकार चषक 2020” या राज्यस्तरीय क्रिकेट सामन्याचे आयोजन दि 17 ते दि 21 जानेवारी रोजी करणेत आले असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस सत्तर हजार रुपये व चषक, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये व चषक, तिसरे बक्षीस तीस हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. तसेच स्व. दिलीपराव रूद्रभटे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज, स्व भालचंद्र देशपांडे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच, स्व दिलीपराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅटमनस अवॉर्ड बक्षीस देण्यात येणार असून याच बरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर व बेस्ट किपर यांना वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आले आहे.
उदघाटन प्रसंगी शिवाजीराव जगताप उपविभागीय अधिकारी, हनुमंत पाटील तहसीलदार, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रसाद काटकर मुख्याधिकारी, सुनील धायगुडे सहाय्यक निबंधक, अमिता गावडे गट विकास अधिकारी,मारुती निकम वनक्षेत्रपाल, फलटण नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे व युवा नेते नगरसेवक कुमारशेठ शिंदे, युवानेते रणजितसिंह भोसले, नगरसेवक सनी अहिवळे, माऊली सावंत व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ होणार आहे.या आयोजित सामन्यात मुंबई,ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद विभागातील रणजी करंडक मध्ये भाग घेतलेले खेळाडूचा सहभागी होणार आहेत .त्याच बरोबर १९ वर्षाखालील नामवंत फलंदाज व गोलदाज आपले कौशल्ये दाखवणार असून या सामन्याचे फलटण तालुक्यातील क्रिकेट रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन फलटण शहर व तालुक्यातील पञकार यांच्या वतीने करणेत आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!