निंबळक : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतात ही आव्हाने पार करून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला गुरु असावा.स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर ब्रम्हचारी राहुन हिंदू धर्मासाठी आयुष्य वेचले , जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये मने जिंकली व भारत देशाची संस्कृती व हिंदू धर्म याची माहिती जगाला दिली.स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे .तरुणांनी स्वामी विवेकानंद समजून घेतले पाहिजेत असे विचार साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहात आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण याविषयी स्वामी विवेकानंद संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल निंबळक येथे मांडले.यावेळी व्यासपिठावर सोसायटीचे चेअरमन दादासो कापसे,नानासो इवरे,सोनबा इवरे,मुख्याध्यापक डी.जे.मोहीते उपस्थित होते.ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की,शिक्षणाचे महत्व ज्याला कळाले तो यशस्वी होतो त्यासाठी चिकाटी,जिद्द,अपार कष्ट,प्रयत्न व योग्य व्यवसायाची निवड फार महत्त्वाची आहे.स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक आहेत.त्यासाठी वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे.
यावेळी नानासो इवरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मोहीते डी.जे. यांनी केले,सूत्रसंचालन बल्लाळ सर यांनी केले,विभुते सर यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवधूत कोळी,देशमुख सर,कलस्कर मैडम यांनी परिश्रम घेतले.सुरवातीला स्वामी विवेकानंद व डॉ.बापुजी साळुंखे यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ व गुलाबपुष्पे देऊन करण्यात आला.यावेळी विध्यार्थी ,पालक उपस्थित होते.