फलटण : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी फलटण येथे संपन्न होणार असून तिसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी खंडाळा जि सातारा येथील प्रसिद्ध साहित्यिक विलास वरे यांची निवड करण्यात आली आहे.
फलटण येथील आशिर्वाद मंगल कार्यालय फरांदवाडी ता. फलटण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ सुधीर इंगळे प्रसिद्ध साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य जगन्नाथ शिंदे अमोल सस्ते प्रा नितीन नाळे व संयोजक प्रकाश सस्ते संपादक व साप्ताहिक अॅग्रोन्युज परिवार सदस्य उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन
निमित्ताने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटात संपन्न झाली असून अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धा प्रमुख महादेव शिवराम गुंजवटे यांनी या स्पर्धेचा निकाल खालील मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर केला.
यशस्वी स्पर्धकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी फलटण येथे संपन्न होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार असून समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे.
तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे खुला गट कु. प्रतिक्षा अनिल कदम, मु.पो. गोंदवले बुद्रुक, ता.माण. द्वितीय क्रमांक कु. ऋतुजा बाजीराव गावडे मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण. तृतीय क्रमांक विभागून कु. सिमरन नसीमअहमद पठाण, साईनगर, जाधववाडी, फलटण कु. प्रीती बाळासो कोकरे सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण, कु.गौरी राजेंद्र कदम मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण. कु. साक्षी शंकर गुंजवटे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण.
इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कु. सिद्धि रावसाहेब झगडे मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक विभागून तेहसीन जावेद आतार आदर्की बुद्रुक, ता. फलटण इयत्ता नववी, कु. ज्ञानेश्वरी नानासाहेब गाडे मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता आठवी, तृतीय क्रमांक कु. विजया सुनील कदम मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता दहावी, उत्तेजनार्थ कु. धनश्री तानाजी शिंदे आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय फलटण., द्वितीय क्रमांक उत्तेजनार्थ कु. राजश्री विवेक पवार मुधोजी हायस्कूल फलटण.
इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक कु. श्रेया नवनीत पेटकर मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता पाचवी, द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी अमोल सस्ते जिल्हा परिषद केंद्र शाळा निरगुडी ता. फलटण इयत्ता सातवी तृतीय क्रमांक विभागून कु.आरती बाळासाहेब ननवरे मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता सहावी, चि. संस्कार दत्तात्रय नाळे स्व. शीलादेवी शरद दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी ता. फलटण, उत्तेजनार्थ कु.स्वराली संजय सरगर मुधोजी हायस्कूल फलटण इयत्ता सातवी, कु. पूर्वा रवींद्र सस्ते जिल्हा परिषद केंद्र शाळा निरगुडी ता. फलटण.
तालुकास्तरीय निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून गोडसे सर यांनी काम पाहिले तर कार्याध्यक्ष अमोल शिरीष सस्ते, प्रा. नितीन नाळे, ज्ञानेश्वर देशमुख यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक जगन्नाथ शिंदे, संमेलनाध्यक्ष विलास वरे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सुधीर इंगळे, लेखक बी.के.भाऊ निंबाळकर, प्रा. नितीन नाळे व संयोजक प्रकाश सस्ते उपस्थित होते.