फलटण : सासवड ता. फलटण येथील श्रीमती शांताबाई धोंडीराम अनपट यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्या त्या मातोश्री होत्या.
श्रीमती शांताबाई धोंडीराम अनपट याच्या पश्चात एक विवाहित मुलगी व दोन विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
श्रीमती शांताबाई अनपट यांचे पती कै. धोंडीराम अनपट यांचे निधन झाल्यानंतर सासु यशोदाबाई अनपट व तीन लहान मुले यांना घेऊन समाजात आपल्या पतीचे राजकीय असणारे अस्तित्व अधिक जोमाने जोपासले व वाढविले. त्याचेच फलित म्हणजे सलग 15 वर्षे मुलगा धैर्यशील धोंडीराम अनपट हे सासवड ता. फलटण गावचे ग्रामपंचायत सदस्य होते. चिमणराव कदम पतसंस्थेची स्थापना भैरवनाथ विकास सेवा सोसायटी या माध्यमातून मुलांना राजकारणाबरोबरच समाजकारण समाजकार्याची आवड त्यांनी निर्माण केली त्यामुळेच मोठी सुन सौ. सारिका अनपट यांना मागील पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आता मुलगा दत्ता अनपट जिल्हा परिषद सदस्य यांना संधी मिळाली आहे तर धाकटा मुलगा धर्मवीर अनपट ही मागील पाच वर्षात ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत.
सहकारातून सर्वसामान्यांचे भले कसे करायचे त्याच बरोबर राजकारण करताना विरोधकांना सुद्धा आपुलकी प्रेम निर्माण करण्याची ताकद या दोन्ही मुलांना निर्माण करून देण्याचे कसब कौशल्य सहनशीलता ही देणगी श्रीमती शांताबाई अनपट यांनी दिली. आज राजकारणात समाजकारणात दोन्ही मुले यशस्वीपणे खंबीरपणे उभी राहू शकली आहेत यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शांत संयमी सुसंस्कृत सभ्य असे असे व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती म्हणून त्यांची या परिसरात ख्याती होती. कोणतीही व्यक्ती त्यांच्या घरी गेली गेली तरी त्यांचे आपुलकीने आपलेपणाने प्रेमाने विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखात पूर्णपणे वाहून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराबरोबर संपूर्ण सासवड गाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. प्रेमळ व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करणारे व गावाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत आ. दीपक चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मंगेश धुमाळ जयकुमार इंगळे महादेव चव्हाण नंदकुमार भोईटे शिवरुपराजे खर्डेकर डि. के. पवार अच्युतराव खलाटे माणिकराव सोनवलकर शरदराव भोईटे अशोक सस्ते दत्तात्रय गुंजवटे भास्कर साहेब जे. पी. गावडे व हिंगणगाव गटातील सर्व सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.