सोमवार दि. 13 ते रविवार दि.19 जानेवारी अखेर मुधोजी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर

 

                                                                फलटण : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विकास व पर्यावरण संवर्धनाच्या घोष वाक्याखाली विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सोमवार दि.13  ते रविवार 19 जानेवारी या कालावधीत राजुरी ता. फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  डॉ. अरुण गायकवाड शिबीर संयोजक प्रा.सुनिल गोडसे व शिबीर समन्वयक प्रा. मदन पाडवी यांनी दिली आहे. 

विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन सोमवार दि 13 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटण तालुका दुध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती सौ.रेखाताई खरात ,  सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ.भावना सोनवलकर, पंचायत समिती सदस्य नानासाहेब लंगुटे व राजुरी गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
  शिबिराचा समारोप रविवार दि.19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आ. दिपक चव्हाण पंचायत समिती सदस्य यांच्या विश्वजितराजे नाईक निंबाळकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख हे राहणार आहेत. 
विशेष श्रमसंस्कार शिबीरात विविध मान्यवरांची व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्यक्रम करिअर मार्गदर्शन शिबीर प्रभात फेरी व विविध सामाजिक, सांस्कृतिक, शेळीमेंढी पालन प्रशिक्षण व तपासणी , महिला मेळावा माती व पाणी परीक्षण व्यसनमुक्ती पर्यावरण संतुलन वक्षारोपण ज्येष्ट नागरीक मेळावा गाव सुशोभीकरण व स्वच्छता इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष श्रमसंस्कार शिबिरास फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शिबीरार्थींना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्याचे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ अरूण गायकवाड व उपप्राचार्य प्रा.सुरेश ठोंबरे यांनी केले आहे .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!