फलटण : माजी नगराध्यक्ष व सदगुरू व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मातोश्री श्रीमती लीलावती ग्यानोबाराव भोसले यांचे वयाचा 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच शहर व तालुक्यासह सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातुन अनेकांनी येथे येऊन अंत्यदर्शन घेतले व भोसले कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यांच्या पार्थिवावर फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सहकार, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, कार्यकर्ते उपस्थित होते.
जुन्या पिढीतील असूनही त्यांनी आपल्या सुना नात सुना यांना उच्च शिक्षणासाठी व सामाजिक कार्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.