फलटण : जागतिक स्तरावर 180-200 आर्किटेक्ट्स सहभागी झालेल्या लंच बॉक्स या डिझाईन कॉम्पिटीशन मध्ये येथील मेहता एंटरप्रायजेसचे सुभाषभई मेहता व सौ. संगीताबेन मेहता यांचे सुपुत्र चि. स्विकार मेहता यांनी प्रथम क्रमांक पटकावीत फलटणचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.
काम करताना वातावरण आनंदी राहील आणि मजा येईल असे ऑफिस डिझाईन बेंगलोर येथील साईटवर तयार करण्याची ही स्पर्धा होती, त्यामध्ये चि. स्विकार मेहता याचे डिझाईन सर्वोत्कृष्ट ठरले असून त्याला प्रथम क्रमांकाचा बहुमान देऊन गौरविण्यात आले आहे.
यास्पर्धेत सहभागी सर्व डिझाईनचे मुल्यांकन अमेरिकेतील झहा हदीद आर्किटेक्टस आणि करण ग्रोव्हर आर्किटेक्ट्स यांनी परिक्षक म्हणून केले होते.