गणेश तांबे यांचे,पाझर मातृत्वाचा, पुस्तक प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

 जन्मदात्या आईचे मातृत्व आणि दातृत्व अद्वितीय असते .आईच्या महतीपुढे  सर्व शब्द अपुरेच !कारण  आई हा एक साधा सोपा वाटणारा शब्द पण या शब्दात आफाट माया दडलेली आहे .आई म्हणजे आपल्या जगण्याचं वास्तल्य असतं. आई ही अनंत उपकारांची सावली असते. खरं तर कोणतीच आई आपल्या मुलांवर उपकार करत नसते ,किंबहुना प्रत्येक आईची तशी भावनाही नसते .पण समाजामध्ये वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांची संख्या, रस्त्यावर इतरत्र फिरताना पाहिलेल्या माऊलींकडे बघून वाटतं समाजातील काही घटकांना आईंनी केलेल्या उपकाराची जाणीव होणं गरजेचे वाटतं…
  पाझर मातृत्वाचा…! या पुस्तकातून आई काय असते ,हे सहज ,सोप्या भाषेत आईचे प्रेमळभाव, महती रेखाटलेली आहे.  आजपर्यंत अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व होत राहतील. पण या पुस्तकाचे  एक वेगळेपण म्हणजे इयत्ता पहिलीपासून सर्व विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ या पुस्तकातून चिमुकल्या बालमनाला मिळाले आहे .याचा मनापासून आनंद वाटतो . *एकूण ४३ लेख व निबंध या पुस्तकात असून पहिला लेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सातारा यांचा आहे ,तर शेवटचा लेख इयत्ता पहिलीच्या विदयार्थाचा असून एक आगळं वेगळं पुस्तक निर्मितीचा प्रयत्न केला* असून,पाझर मातृत्वाचा हे पुस्तक लहानांपासून, सर्व वाचक मित्र , तसेच बंधू -भगिनींना व बालचमुंना  निश्चितच वाचण्यासाठी आवडेल अशी आशा वाटते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!