वाखरी ( वार्ताहर )फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत रेगुलर कर्ज भरणारे सभासदांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी एका ठरावाव्दारे करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे होते.
मध्यंतरी गोखळी, खटकेवस्ती, साठे या परिसरातील नीरा नदीच्या पुरामुळे बांधीत शेतकर्याचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे आणि मध्यम मुदत कर्ज सुद्धा माफ करावे अशा ठराव करण्यात आला. दोन लाखांच्या वर शेतकर्याचे कर्ज आहे. त्यांनाही कर्ज माफीचा लाभ मिळवून द्यावाच, या गोखळी सोसायटीचे एकूण सातशे सभासद असुन पैकी कर्जदार सभासद ६५०आहेत. शासनाच्या या धोरणानुसार ६५० पैकी ७९सभासदांना आघाडी शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सुमारे ५७५रेगुलर कर्ज भरणारे व त्यातील काही नवेजूने करून उसने पैसे घेऊन कर्जफेड केलेली आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे असेच चालू राहिले तर सभासद कर्ज भरणार नाहीत पर्यायाने सहकारी सोसायट्या ,बॅका अडचणी येथील तरी शासनाने आपल्या कर्जमाफी धोरणात सुधारणा करून त्यात रेगुलर कर्जदार सभासदांचा अंतर्भाव करावा अशी मागणी या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली .यावेळी झालेल्या चर्चेत सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, व्हाईस चेअरमन रघुनाथ ढोबळे, बाळासाहेब खटके, आप्पासाहेब मिंड ,बाबासाहेब धायगुडे, विशाल खटके यांची विचार मांडले. विकास सोसायटीचे सचिव दिगंबर घाडगे यांनी संपूर्ण कर्जमाफी बद्दल सभासद वार माहिती दिली.