गोखळी पाटी ता. फलटण येथे शेतकरी यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

फलटण दि. ८ : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज बुधवार दि.8 फेब्रुवारी रोजी तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी पाटी ता. फलटण येथील चौकात शेतकरी यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 
रस्ता रोको आंदोलनासाठी गोखळी व पंचक्रोशीतील सर्व विविध कार्यकारी  सहकारी सोसायटीचे सभासद  साठे, खटकेवस्ती, पवारवाडी परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी  सहभागी झाले होते. 
आघाडी शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरु केली मात्र प्रत्यक्षात शेतकरी कर्जमाफी योजना फसवी निघाली. सरकार कर्जमाफीसाठी निकष लावण्यात येणार नाही म्हणाले मात्र लागू केलेल्या कर्ज माफीचा ठरावीक शेतकर्यानाच प्रत्येक कर्जमाफी योजनेत फायदा होत असल्यांचा आरोप श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके यांनी यावेळी केला.
तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद यांना एकञ करून पक्षविरहित शेतकरी कृती  समितीच्या माध्यमातून उग्र स्वरूपाचे  आंदोलन करून भव्य मोर्चा काढणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे फलटण विधानसभा  प्रमुख पै.बजरंग गावडे यांनी सांगितले. 
 शेतकरी सभासदांवर कर्जमाफी योजनेत झालेल्या अन्यायबद्दल शांततेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनास शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने सहकार्य केल्याबदल गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे यांनी आभार मानले.   फलटण ग््रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरक्षक  नितिन सावंत यांना शेतकरी आंदोलकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. 
यावेळी डाॅ.राधेश्याम गावडे, खटकेवस्तीचे सरपंच  बापूराव गावडे ,डाॅ.हणमंत गावडे, रघुनाथ ढोबळे, मधुकर गावडे, अनिल धुमाळ, मिलिंद खटके, राधेश्याम जाधव, संतोष खटके, दादासाहेब खटके, पिंटू जगतात, योगेश गावडे, अनिरुद्ध गावडे, प्रल्हाद खटके उपस्थित होते. 
 नियमित कर्जफेड करणारे शेतकरी सभासदांना रूपये दोन लाख पर्यंत हक्काने लाभ मिळाला पाहीजे, दोन लाखांवरील थकबाकीदार सभासदांना, मध्यम मुदत थकबाकीदार सभासदांना या योजनेचा लाभ मिळावा, पुरग्रस्त व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, शेतीमालाला रास्त बाजार भाव मिळावा आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
 रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी फलटण पोलीस उपनिरक्षक नितिन सावंत व पोलीस अधिकारी व पोलीस पाटील विकास शिंदे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!