गोखळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न

गोखळी  (प्रतिनिधी )  सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विद्यार्थीनींनी जिजाऊ ,अहिल्या, सावित्री, इंदिरा गांधी,  प्रतिभाताई पाटील,  आनंदीबाई जोशी ,किरण बेदी भूमिका वठवून त्यांच्या  आठवणी जागवल्या  गोखळीत जणू काय ? जिजाऊ ते इंदिरा गांधी अवतरल्याचा भास विद्यार्थ्यांना झाला.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये नुतन वर्षाच्या निमित्ताने 1 जानेवारी ते सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे विद्यालयात आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कबड्डी, खो-खो ,वक्तृत्व , निबंध स्पर्धा ,लांब उडी,चमच्या लिंबू,  संगीत खुर्ची ,हत्तीला डोळे बांधून शेपूट लावणे,धावणे,स्लो सायकलींग आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्ताने करण्यात आली.सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी राष्ट्रमाता माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, अहिल्यादेवी ,भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी ,पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला आय.पी.एस.किरण बेदी आदी भूमिका साकारली आपल्या  राष्ट्रमातांचा   वत्कृत्वाने इतिहास डोळ्यासमोर उभा करून आठवणी जागवल्या .तसेच भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये आठवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या रांगोळीतून ‘बेटी बचाव,बेटी पढाओ ,’लेक वाचवा’, ‘ आई मला वाचवं’,’मुलगी वाचव’या रांगोळीतून ‘स्ञी भूण्रहत्या’थांबवा असा संदेश दिला. 
 तीन दिवस   विद्यालयाच्या भव्य पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यालयाच्या उपशिक्षका निकम मॅडम यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त   सर्व विद्यार्थ्यांना भोजन दिले. 
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य डी.एन.भिवरकर ,एस.बी. निकम मॅडम  शेडगे, एस.टी.  जाधव सर  , सुप्रिया  धायगुडे मॅडम, आर.व्ही. जाधव मॅडम, शुभांगी भोसले मॅडम घोरपडे सर,राजेन्द्र भागवत आदींनी परिश्रम घेतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!