गोखळी (प्रतिनिधी ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शांतीदासनगर (गोखळी )येथे श्री दत्त जयंती व परमपूज्य सदगुरू शांतीदास महाराज यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 4 डिसेंबर ते 12 डिसेंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे 4ते6 काकडा,सकाळी 7ते 10 श्री ज्ञानेश्वरी पारायण, गुरूचरिञ पारायण 5ते 6 हरिपाठ , सायंकाळी 7 ते 9 किर्तन, राञी 9 नंतर महाप्रसाद दररोज सायंकाळी पुढील प्रमाणे किर्तन सेवा होणार आहे. ह.भ.प.गोरखनाथ जाधव , ह.भ.प.बापूमहाराज टेंगले, ह.भ.प. मिलिंद महाराज ढम, ह.भ.प.सुरेश महाराजसाठे, ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर, ह.भ.प.रामदास महाराज जगतात, ह..भ.प.तुळशिदास महाराज रसाळ आणि दि,12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 यावेळे मध्ये ह.भ.प.शामसुंदर महाराज ढवळे यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे. गुरूवार दि.12
डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्री दत्त जयंती उत्सव व दुपारी 12-30 वाजता परंपूज्य शांतीदास महाराज पुण्यतिथी संपन्न होणार आहे. भाविकांनी दोन्ही कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव समितीचे वतीने करण्यात आले आहे.